कोट्यवधींची मालमत्ता कवडीमोल भावात विकण्याचा डाव

Foto
पैठणचे माजी आमदार संजय वाघचौरे यांचा आरोप

पैठण, (प्रतिनिधी) शहरातील नविन कावसान या ठिकाणी असलेल्या खरेदी विक्री संघाच्या कोट्यावधी रुपयाची मालमत्ता कवडीमोल दराने विकत असल्याचा आरोप माजी आमदार संजय वाघचौरे यांनी पत्रकार परीषदेत केला आहे.

 कावसान येथे खरेदी विक्री संघाची गट क्रमांक १३६ मधील ६ एकर जमीन विकण्याचे जाहीर प्रगटन नुकतेच संघाच्यावतीने काढण्यात आले आहे, या विषयी पत्रकार परिषदेत बोलताना आमदार वाघचौरे म्हणाले सध्या जमीन ज्या ठिकाणी आहे. त्या ठिकाणच्या जमीनीचे बाजार मुल्य जवळपास १०० ते २०० कोटीचे कोटीचे असुन संघ हि जमीन केवळ १० कोटीत विकत असल्याचा आरोप वाघचौरेंचा आहे.

या प्रकरणी आपण न्यायलयात जाणार असुन स्थानिक स्तरावर या विषयी तक्रारी करण्यात आलेल्या आहेत. या पुर्वी संघाने नाथ हायस्कुल समोर गाळे बांधण्याचा निर्णय घेतला होता लिलावाद्वारे व्यापार्याकडून प्रती गाळा लाखो रुपये अनामत म्हणुन घेण्यात आले आहे, 

ते काम पुर्ण झालेले नाही, व्यापार्यांचा पैसे संघाने परत केलेले नाही, संघाने केलेल्या जमीन घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशीची मागणी आपण करणार असुन तालुक्याच्या मालकीच्या जमीनी कवडी मोल विकू देणार नाही असेही वाघचौरे या पत्रकार परिषदेत सांगीतले या पत्रकार परिषदेला राकाँचे शहराध्य उमेश पंडूरे, युनूस पठाण आदींची उपस्थिती होती.